नेहमीचा गाजर हलवा खाऊन कंटाळा आलाय का?
मग आज नक्की ट्राय करा ही खास आणि चविष्ट शाही गाजर खीर!
साहित्य
गाजर – 3 ते 4 (बारीक किसलेले)
एस. आर. थोरात शक्ती मिल्क – 1 लिटर
गगनगिरी स्किम्ड मिल्क पावडर – 1 वाटी
पाणी – आवश्यकतेनुसार (स्लरीसाठी)
गगनगिरी तूप – 3 चमचे
साखर – चवीनुसार
काजू – 8 ते 10 (कापलेले)
बदाम – 8 ते 10 (कापलेले)
पिस्ते – सजावटीसाठी
कृती
सर्वात आधी गाजर स्वच्छ धुवून बारीक किसून घ्या.
एका वाटीत गगनगिरी स्किम्ड मिल्क पावडर घ्या व त्यात थोडे पाणी घालून पातळ स्लरी तयार करा.
एका पॅनमध्ये एस. आर. थोरात शक्ती मिल्क घ्या आणि ते चांगले उकळवून बाजूला ठेवा.
दुसऱ्या पॅनमध्ये गगनगिरी तूप गरम करा. त्यात काजू-बदामाचे काप आणि किसलेले गाजर घालून मध्यम आचेवर चांगले परतून घ्या.
गाजर थोडे शिजल्यावर त्यात चवीनुसार साखर घालून व्यवस्थित मिक्स करा.
आता त्यात तयार केलेली मिल्क पावडर स्लरी आणि उकळलेले दूध घालून सर्व मिश्रण एकत्र करा.
खीरला चांगली उकळी येऊ द्या आणि ती दाटसर होईपर्यंत शिजवा.
गॅस बंद करा. गरमागरम शाही गाजर खीर एका वाटीत काढा व पिस्त्याच्या कापांनी सजवा.