जर तुम्ही पनीरच्या नेहमीच्या रेसिपी खाऊन कंटाळले असाल, तर ही झणझणीत पनीर-प्याझा रेसिपी नक्की ट्राय करा कांदा, पनीर आणि खास मसाल्यांच्या चवीने भरलेली ही भाजी जेवणाची मजा दुप्पट करते.

साहित्य :
पनीर – त्रिकोणी तुकडे
कांदा – उभा चिरलेला
टोमॅटो – चिरलेले
हिरवी मिरची – 2
लसूण – 5 ते 6 पाकळ्या
काजू – थोडे
मगजबी – थोडी
कांदा – काप (तडका साठी)
तेल – आवश्यकतेनुसार
मीठ – चवीनुसार
हळद – ½ टीस्पून
गरम मसाला – ½ टीस्पून
किचन किंग मसाला – 1 टीस्पून
लाल तिखट – चवीनुसार
खडे मसाले:
जिरे
दालचिनी
लवंग
वेलची

कृती :
कढईत थोडे तेल गरम करून उभा चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण, काजू आणि मगजबी परतून घ्या.
मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून पनीरचे त्रिकोणी तुकडे दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
कढईत थोडे तेल घालून खडे मसाले परता.
तयार केलेली पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
त्यात मीठ, गरम मसाला, हळद, लाल तिखट आणि किचन किंग मसाला घालून मिक्स करा.
थोडे पाणी घालून ग्रेव्ही तयार करा.
झाकण ठेवून ५ मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या.
ग्रेव्ही शिजल्यानंतर त्यात तळलेले पनीरचे तुकडे टाका.
छोट्या पॅनमध्ये तेल गरम करून कांद्याचे काप फ्राय करा.
त्यात थोडी लाल मिरची पावडर घालून मिक्स करा.
हा तडका पनीरच्या भाजीवर घालून हलक्या हाताने मिक्स करा.

Search