आज आपण बनवणार आहोत वेट लॉस साठी परफेक्ट आणि टेस्टमध्ये टेन ऑन टेन — झटपट तयार होणारे ब्रोकली पनीर सॅलड!
फ्रेश भाज्या आणि गगनगिरी मलाई पनीर वापरून तयार करा हे हेल्दी, हाय-प्रोटीन आणि लो-कॅलरी सॅलड — जे लंच, डिनर किंवा इव्हनिंग स्नॅकसाठी एकदम परफेक्ट आहे.
साहित्य:
१ बाउल ब्रोकली (चिरलेली)
½ बाउल कॉर्न सीड्स
½ रेड शिमला मिर्च (चिरलेली)
१-२ ग्रीन चिली (चिरलेली)
१ टीस्पून क्रश गार्लिक
१ टीस्पून क्रश जिंजर
२०० ग्रॅम गगनगिरी मलाई पनीर
१ टेबलस्पून तेल
मीठ चवीप्रमाणे
½ टीस्पून ब्लॅक पेपर
कृती:
ब्रोकली, शिमला मिर्च आणि ग्रीन चिली नीट धुऊन चिरून घ्या.
गगनगिरी मलाई पनीर दाखवल्याप्रमाणे चौकोनी तुकड्यांमध्ये कापून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करा आणि त्यात पनीरचे तुकडे घालून गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करा.
फ्राय केलेले पनीर बाहेर काढून बाजूला ठेवा.
त्याच पॅनमध्ये क्रश गार्लिक, क्रश जिंजर आणि ग्रीन चिली परता.
नंतर रेड शिमला मिर्च, कॉर्न सीड्स आणि ब्रोकली घालून व्यवस्थित मिक्स करा.
२–३ मिनिटे हलके परता जेणेकरून भाज्या थोड्या क्रंची राहतील.
आता फ्राय केलेले पनीर त्यात घाला.
मीठ आणि ब्लॅक पेपर टाकून सर्व साहित्य नीट मिक्स करा.
गरमागरम सर्व्ह करा आणि एन्जॉय करा हेल्दी, टेस्टी आणि प्रोटीन-रिच ब्रोकली पनीर सॅलड.