आज आपण बनवतोय सगळ्यांची आवडती स्ट्रीट-स्टाईल पावभाजी अगदी घरच्या घरी
गगनगिरी तूप आणि बटर वापरून तयार केलेली ही पावभाजी चवीला एकदम हॉटेलसारखी लागते.

साहित्य :
पाणी – आवश्यकतेनुसार
गगनगिरी तूप – 1 चमचा
हिरवे मटर – 1 वाटी
कांदा – 1 (चिरलेला)
बटाटे – 2
वांगी – 1
गाजर – 1
फ्लॉवर – थोडा
टोमॅटो – 2
शिमला मिरची – 1
मीठ – चवीनुसार

फोडणीसाठी :
गगनगिरी बटर – 2 टेबलस्पून
जिरे – 1 चमचा
आलं-लसूण पेस्ट – 1 टेबलस्पून
हिरवी मिरची – 1–2 (बारीक चिरलेली)
कांदा – 1 (बारीक चिरलेला)
टोमॅटो – 2 (चिरलेले)

मसाले :
पावभाजी मसाला – 2 टेबलस्पून
गरम मसाला – ½ चमचा
लाल तिखट – चवीनुसार
हळद – ½ चमचा
साखर – चवीनुसार
टोमॅटो पेस्ट – 2 टेबलस्पून

कृती :
कुकरमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यात गगनगिरी तूप घाला.
त्यात हिरवे मटर, कांदा, बटाटा, वांगी, गाजर, फ्लॉवर, टोमॅटो, शिमला मिरची आणि मीठ घालून भाज्या शिजवून घ्या.
भाज्या शिजल्यानंतर त्या चांगल्या प्रकारे स्मॅश करून ठेवा.
आता एका पॅनमध्ये गगनगिरी बटर घाला.
बटर वितळल्यानंतर जिरे, आलं-लसूण पेस्ट, कांदा आणि हिरवी मिरची घालून परतून घ्या.
त्यात टोमॅटो घालून मिश्रण चांगलं शिजवा.
मग पावभाजी मसाला, गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि मीठ घालून सगळं नीट मिक्स करा.
टोमॅटो पेस्ट, थोडे हिरवे मटर आणि साखर घालून झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत शिजवा.
शेवटी बारीक चिरलेली शिमला मिरची आणि स्मॅश केलेल्या भाज्या घालून नीट मिक्स करा.

Search