फक्त 10 मिनिटांत शुद्ध आणि खमंग शेंगदाण्याची चक्की | Gagangiri Tupp Recipe | Peanut Chikki फक्तफक्त दहा मिनिटांत घरच्या घरी बनवा शुद्ध, खमंग आणि चविष्ट शेंगदाण्याची चक्की!
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही सोपी रेसिपी खास गगनगिरी तूप वापरून तयार केली आहे.
साहित्य
शेंगदाणे – 1 वाटी
गगनगिरी तूप – 2 टेबलस्पून
गूळ – 1 वाटी
साखर – 1 वाटी
पाणी – 2 ते 3 टेबलस्पून
कृती
कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे घालून ते मध्यम आचेवर चांगले भाजून घ्या.
भाजल्यानंतर शेंगदाण्यांची साल काढून ठेवा.
दुसऱ्या कढईमध्ये 2 टेबलस्पून गगनगिरी तूप घालून ते वितळू द्या.
तूप वितळल्यानंतर त्यात 1 वाटी गूळ, 1 वाटी साखर आणि थोडे पाणी घाला.
हे मिश्रण सतत हलवत राहा, जोपर्यंत ते पूर्णपणे वितळत नाही.
मिश्रण दाखवल्याप्रमाणे तयार झाल्यावर त्यात गरम भाजलेले शेंगदाणे घाला.
सगळे नीट मिक्स करून घ्या.
मिश्रण थोडे थंड झाल्यावर बेसवर थोडे गगनगिरी तूप लावा.
चक्कीचे मिश्रण बेसवर समान पसरवा.
हव्या त्या आकारात कट करा.