घरच्या घरी मऊ, सुगंधी आणि स्वादिष्ट असा केळ्याचा शिरा बनवा. पूजा, प्रसाद आणि खास प्रसंगासाठी उत्तम रेसिपी.
साहित्य:
२ केळी
१ बाउल साखर (चवीनुसार)
१ बाउल रवा
१ बाउल ड्रायफ्रुट्स
१ + १ टेबलस्पून गगनगिरी तूप
S.R. Thorat शक्ती मिल्क (आवश्यकतेनुसार)
बारीक केलेली वेलची

कृती:
केळी सोलून छोटे तुकडे करून घ्या.
कढईत १ टेबलस्पून गगनगिरी तूप गरम करा.
त्यात ड्रायफ्रुट्स घालून गोल्डन रंग येईपर्यंत परतून घ्या आणि बाहेर काढा.
त्याच कढईत रवा घालून तुपासोबत छान भाजून घ्या.
दुसऱ्या पातेल्यात S.R. Thorat शक्ती मिल्क चांगले उकळून घ्या.
भाजलेल्या रव्यामध्ये १ टेबलस्पून तूप घालून मिक्स करा.
त्यात वेलची पूड आणि गरम दूध घालून सतत हलवत राहा.
चवीनुसार साखर घाला आणि नीट मिक्स करा.
त्यात केळीचे तुकडे घालून शिरा छान शिजू द्या.
वरून परतलेले ड्रायफ्रुट्स घालून सजवा.

Search