क्रीमी ब्रेड रसमलाई

साहित्य:

  • S.R. Thorat Shakti Milk – आवश्यकतेनुसार
  • केसर – थोडे
  • साखर – चवीनुसार
  • कस्टर्ड पावडर – आवश्यकतेनुसार
  • पाणी – थोडे
  • ब्रेड स्लाइस – आवश्यकतेनुसार
  • S.R. Thorat Gagangiri तूप – २ टेबलस्पून
  • ड्रायफ्रूट्स – गार्निशिंगसाठी

कृती:

  1. कढईमध्ये S.R. Thorat Shakti Milk घेऊन त्यात केसर घाला आणि दूध उकळीला आणा.
  2. उकळी आल्यानंतर चवीनुसार साखर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  3. एका वाटीत कस्टर्ड पावडर आणि थोडे पाणी घेऊन गुठळ्या राहणार नाहीत अशा प्रकारे मिक्स करा.
  4. हे कस्टर्ड मिश्रण दुधात घालून सतत ढवळत राहा. मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करा.
  5. ब्रेडचे छोटे स्लाइस करून घ्या.
  6. पॅनमध्ये २ टेबलस्पून S.R. Thorat Gagangiri तूप गरम करून त्यात ब्रेड स्लाइस हलकेच रोस्ट करून घ्या.
  7. रोस्ट केलेले ब्रेड एका बाऊलमध्ये ठेवा आणि त्यावर तयार केलेली रसमलाई ओता.
  8. आवडीनुसार ड्रायफ्रूट्सने गार्निश करा.
Search