आज आपण बनवणार आहोत टेस्टी आणि स्टिकी पनीर पकोडे
या रेसिपीसाठी वापरले आहे खास गगनगिरी पनीर, शिमला मिर्च आणि कांदा.
संध्याकाळच्या चहासाठी किंवा पार्टी स्नॅक्ससाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे.
साहित्य:
गगनगिरी पनीर – आवश्यकतेनुसार (क्युब्समध्ये कापलेले)
शिमला मिर्च – 1 (चौकोनी कापलेली)
कांदा – 1 (चौकोनी कापलेला)
मैदा – 1 वाटी
कॉर्नफ्लॉवर – 2 टेबलस्पून
हळद – 1 टेबलस्पून
गरम मसाला – 1 टेबलस्पून
लाल तिखट – 1 टेबलस्पून
मीठ – चवीनुसार
पाणी – आवश्यकतेनुसार
वूडन स्टिक्स – आवश्यकतेनुसार
तेल – तळण्यासाठी
टोमॅटो सॉस – सर्व्ह करण्यासाठी
कृती:
सर्वप्रथम पनीर, शिमला मिर्च आणि कांदा कापून घ्या.
एका बाउलमध्ये मैदा, कॉर्नफ्लॉवर, हळद, गरम मसाला, लाल तिखट आणि मीठ घाला.
थोडेथोडे पाणी घालून गुठळ्या न राहता घट्टसर मिश्रण तयार करा.
वूडन स्टिकमध्ये आधी शिमला मिर्च, नंतर कांदा आणि शेवटी पनीर असे दाखवल्याप्रमाणे लावा.
तयार स्टिक्स पनीरच्या मिश्रणात नीट डीप करा.
पॅनमध्ये तेल गरम करा आणि मिश्रण लावलेले स्टिक्स सावकाश तेलात सोडा.
पनीर पकोडे गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळा.
गरमागरम पकोडे टोमॅटो सॉस आणि चहासोबत सर्व्ह करा.