आज आपण बनवणार आहोत खास रेस्टॉरंट स्टाईल – काजू पनीर!
सणासुदीला, पाहुण्यांसाठी आणि मुलांसाठी एकदम परफेक्ट झणझणीत डिश.
गगनगिरी मलाई पनीर आणि तुपाने बनवलेली हि डिश अगदी हॉटेललाही मागे टाकेल.
साहित्य:
२०० ग्रॅम गगनगिरी मलाई पनीर (क्यूब्समध्ये कट केलेले)
१ मध्यम कांदा (स्लाइस केलेला)
१ चमचा कांद्याची पेस्ट
१ चमचा आलं पेस्ट
१ चमचा लसूण
२ हिरव्या मिरच्या (चिरलेल्या)
१/२ कप टोमॅटो पेस्ट
१/४ टीस्पून हळद
१ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून धणे पूड
१/२ टीस्पून गरम मसाला
चवीनुसार मीठ
१ चमचा साखर
२ चमचे काजू पेस्ट
थोडं पाणी
थोडी कस्तुरी मेथी
गगनगिरी तूप
थोडे काजू (फ्रायसाठी)
थोडी कोथिंबीर (गार्निशिंगसाठी)
कृती:
एका कढईत तेल गरम करून त्यात खडे मसाले, स्लाइस कांदा आणि कांद्याची पेस्ट टाकून परतून घ्या.
कांदा गोल्डन ब्राउन झाला की त्यात आलं पेस्ट, लसूण आणि हिरवी मिरची टाकून मिक्स करा.
नंतर टोमॅटो पेस्ट टाकून नीट परतून घ्या.
त्यात हळद, तिखट, धणे पूड, गरम मसाला आणि मीठ घालून परतून घ्या.
नंतर साखर व काजू पेस्ट घालून थोडं पाणी टाकून ग्रेव्ही तयार करा.
त्यात गगनगिरी मलाई पनीरचे क्यूब्स घालून एक वाफ काढा.
वरून कस्तुरी मेथी टाका.
वेगळ्या पॅनमध्ये गगनगिरी तूप गरम करून त्यात काजू फ्राय करा आणि ग्रेव्हीत टाका.
शेवटी कोथिंबीरने गार्निशिंग करा.
Instagram:https://www.instagram.com/gagangiri_milkproducts/reel/DJn74X4tWgM/



