उन्हाळ्याच्या गरम दिवसांत थंडगार आणि चविष्ट मसाला मठ्ठ्याने घशाला दिलासा मिळतो.

चला तर मग बनवूया हा खास गगनगिरी दह्याचा मसाला मठ्ठा, अगदी घरच्या घरी, कमी वेळात आणि साध्या साहित्याने!

 

साहित्य:

 

1 वाटी गगनगिरी दही

कोथिंबीर (थोडीशी)

पुदिना पाने (थोडीशी)

कढीपत्ता (2-3 पाने)

हिरवी मिरची (1)

आले (1/2 इंच तुकडा)

जिरेपूड (1/2 चमचा)

काळं मीठ (1/2 चमचा)

टाटा मीठ (चवीनुसार)

पाणी (1.5 ते 2 ग्लास)

सजावटीसाठी पुदिन्याची पाने

 

कृती:

 

मिक्सर जारमध्ये कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि आलं घालून चांगलं वाटून घ्या.

त्यात गगनगिरी दही, काळं मीठ, टाटा मीठ, जिरेपूड आणि पाणी घालून पुन्हा ग्राइंड करा.

तयार मठ्ठा गाळून घ्या आणि गार ग्लासमध्ये ओता.

वरून पुदिन्याच्या पानाने गार्निश करा.

मस्त थंडगार मसाला मठ्ठा तयार आहे – लगेच एन्जॉय करा!

 

Instagram:https://www.instagram.com/gagangiri_milkproducts/reel/DJZISHKCxfd/

Search