खिचडी खाऊन कंटाळलात? मग या उपवासात काहीतरी वेगळं आणि स्वीट ट्राय करा – रताळ्याचे गुलाबजाम!
Gagangiri Skimmed Milk Powder आणि उकडलेलं रताळं वापरून तयार होणारी ही स्वीट डिश – खास उपवासासाठी!
साहित्य:
2 मध्यम साईझचे उकडलेले रताळे
2 वाट्या साखर
थोडं पाणी (पाकासाठी)
1 वाटी गगनगिरी स्किम्ड मिल्क पावडर
1 चमचा पाक (डोहसाठी)
तेल/साजूक तूप (तळण्यासाठी)
पिस्ता (गार्निशसाठी)

कृती:
कुकरमध्ये रताळं आणि पाणी टाकून उकडून घ्या
एका भांड्यात साखर व थोडं पाणी टाकून पाक तयार करा
बाउलमध्ये स्किम्ड मिल्क पावडर चाळून, त्यात उकडलेलं रताळं मिक्स करा
एक चमचा पाक घालून डोह तयार करा आणि त्याचे छोटे बॉल्स बनवा
हे बॉल्स तळून घ्या जोपर्यंत ते गोल्डन ब्राउन होत नाहीत
नंतर ते पाकात टाका आणि मऊ होईपर्यंत ठेवून वरून पिस्ता घालून गार्निश करा
गरम किंवा थंड सर्व्ह करा – उपवासात पण गुलाबजामचा स्वाद घ्या!

Search