आज बनवूया दिवाळी स्पेशल काजू कतली — जी आहे झटपट, स्वादिष्ट आणि घरच्या घरी तयार होणारी!
या रेसिपीमध्ये वापरले आहे S. R. थोरात यांचे गगनगिरी Skimmed Milk Powder, जे देते अप्रतिम मऊपणा आणि समृद्ध चव!

साहित्य:
काजू – 2 वाट्या
पिठीसाखर – 1 वाटी
गगनगिरी Skimmed Milk Powder – 2 चमचे
दूध – आवश्यकतेनुसार
सिल्व्हर वर्क (ऐच्छिक)

कृती:
मिक्सर जारमध्ये काजू टाकून बारीक ग्राइंड करा.
पॅनमध्ये काजूची पावडर हलकी भाजून घ्या.
त्यात गगनगिरी Skimmed Milk Powder टाकून नीट मिक्स करा.
आता पिठीसाखर टाकून थोडं थोडं दूध घालत डो तयार करा.
बटर पेपरच्या सहाय्याने डो लाटून घ्या आणि त्यावर सिल्व्हर पेपर लावा.
दाखवल्याप्रमाणे काजू कतलीचे तुकडे करा.
या दिवाळीत बनवा स्वादिष्ट आणि पौष्टिक काजू कतली — गगनगिरीच्या खास स्पर्शाने!

Search