तोंडाला पाणी सुटेल अशी झणझणीत रगडा पॅटी आता बनवा घरच्या घरी – अगदी सोप्या पद्धतीने!
साहित्य :
रगडा बनवण्यासाठी:
२ टेबलस्पून तेल
½ टीस्पून मोहरी
½ टीस्पून जिरे
१ मध्यम कांदा (बारीक चिरलेला)
५-६ कढीपत्ता
२ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)
१ चमचा Maggie मसाला
चवीनुसार मीठ
२ उकडलेले बटाटे (स्मॅश केलेले)
मसाल्याचे वाटण (कोथिंबीर, लसूण, आले, थोडा गरम मसाला वाटून घेतलेला)
आवश्यकतेनुसार पाणी

पॅटीससाठी:
१ वाटी गगनगिरी मलाई पनीर (स्मॅश केलेले)
२ मध्यम बटाटे (उकडून ब्लेंड केलेले)
१ कांदा (बारीक चिरलेला)
२ चमचे कोथिंबीर (बारीक चिरलेली)
२ चमचे ब्रेड क्रम्ब्स
½ टीस्पून हळद
½ टीस्पून गरम मसाला
१ टीस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची
½ टीस्पून चिली फ्लेक्स
½ टीस्पून लाल तिखट
½ टीस्पून कसुरी मेथी
चवीनुसार मीठ
राईस फ्लोअर (कोटिंगसाठी)
तळण्यासाठी तेल

सजावटीसाठी:
बारीक चिरलेला कांदा
शेव
टोमॅटो सॉस
कोथिंबीर
थोडीशी रेड चिली पावडर

कृती (Method):
रगडा बनवण्याची कृती:
एका कढईत तेल गरम करून घ्या. त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा टाकून परतून घ्या.
कांदा थोडासा परतला की त्यात हिरवी मिरची, Maggie मसाला आणि मीठ टाकून मिसळा.
त्यात उकडलेले आणि स्मॅश केलेले बटाटे टाका आणि एकजीव करून घ्या.

मग त्यात वाटलेले मसाल्याचे वाटण टाकून नीट मिक्स करा.आवश्यकतेनुसार पाणी घालून झाकण ठेवून एक वाफ काढा.
पॅटीस बनवण्याची कृती:
एका बाऊलमध्ये गगनगिरी मलाई पनीर, उकडलेले बटाटे, कांदा, कोथिंबीर, ब्रेड क्रम्ब्स, हिरवी मिरची, चिली फ्लेक्स, हळद, गरम मसाला, कसुरी मेथी, लाल तिखट आणि मीठ टाकून सर्व साहित्य नीट मिक्स करा.
या मिश्रणाचे छोटे छोटे पॅटीस तयार करा.
पॅटीस राईस फ्लोअरने कोट करा आणि मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
प्लेटिंग:
एका प्लेटमध्ये तळलेल्या पॅटी ठेवा.
त्यावर तयार गरम रगडा ओता.
वरून बारीक चिरलेला कांदा, शेव, टोमॅटो सॉस, रेड चिली पावडर आणि कोथिंबीर टाकून सजवा.
तयार आहे स्वादिष्ट झणझणीत “”रगडा पॅटी””!

Search