ढाबा स्टाईल चमचमीत पनीर बिर्याणी ट्रीट तेही घरच्या घरी
ही खास रेसिपी बनवण्यासाठी वापरलेलं स्पेशिअल इनग्रेडीयंट म्हणजे गगनगिरी मलाई पनीर रेस्टॉरंट स्टाईल टेस्टी आणि फ्लेव्हरफुल बिर्याणीची मजा आता तुम्ही घरच्या घरी घेऊ शकता.

साहित्य
बासमती तांदूळ – 2 कप (भिजवलेले)
पाणी – आवश्यकतेनुसार
मीठ – चवीनुसार
लिंबाच्या फोडी – 2-3
खडे मसाले (लवंग, दालचिनी, तमालपत्र, वेलची)
तेल – 2 चमचे
गगनगिरी मलाई पनीर – 1 वाटी (क्यूब्स मध्ये कापलेले)
हळद – 1/2 चमचा
लाल तिखट – 1 चमचा
गगनगिरी दही – 1/2 कप
भाज्या – फ्लॉवर, ग्रीन पीस, बीन्स, गाजर, बटाटे
कांदा – 2 (उभा चिरलेला)
हिरव्या मिरच्या – 2-3 (चिरलेल्या)
आलं-लसूण पेस्ट – 1 चमचा
टोमॅटो – 2 (कापलेले)
कोथिंबीर व पुदिना – मूठभर
कस्तुरी मेथी – 1 चमचा
धणे पावडर – 1 चमचा
गरम मसाला – 1 चमचा
गगनगिरी तूप – 2 चमचे
केसर दूध – 2 चमचे

कृती
राईस तयारी:
पाणी गरम करून त्यात मीठ, लिंबाच्या फोडी आणि खडे मसाले घाला.
उकळी आल्यावर लिंबू व मसाले काढून टाका.
त्यात तेल आणि भिजवलेला बासमती तांदूळ घालून हाफ बॉइल करून बाजूला ठेवा.
पनीर मॅरिनेशन:
गगनगिरी मलाई पनीरचे क्यूब्स घ्या.
त्यावर हळद आणि लाल तिखट टाकून मिक्स करा.
भाज्यांचे मॅरिनेशन:
फ्लॉवर, ग्रीन पीस, बीन्स, गाजर, बटाटे एका बाउलमध्ये घ्या.
त्यात गगनगिरी दही, हळद, लाल तिखट आणि मीठ घालून एकजीव करा.
मसाला तयारी:
एका टोपामध्ये तेल गरम करून जिरे आणि खडे मसाले टाका.
आलं-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या आणि कांदा परतून घ्या.
मग त्यात मॅरिनेटेड भाज्या टाका.
कस्तुरी मेथी, टोमॅटो, हळद, धणे पावडर, लाल तिखट, गरम मसाला आणि पुदिना घालून मिक्स करा.
झाकण ठेवून एक वाफ काढा.
पनीर व बिर्याणी लेयरिंग:
तयार मसाल्यात गगनगिरी मलाई पनीर टाका आणि मिक्स करा.
वरून कोथिंबीर घाला.
त्यावर हाफ बॉइल राईस पसरवा.
केसर दूध, गगनगिरी तूप आणि पुदिन्याची पाने टाका.
झाकण ठेवून दम स्टाईलने शिजवा.

सर्व्हिंग:
गरमागरम ढाबा स्टाईल पनीर बिर्याणी सर्व्ह करा.
वरून कोथिंबीर व पुदिना घालून गार्निश करा.
रायता किंवा सॅलड (कांदा, टोमॅटो, काकडी) सोबत एन्जॉय करा.

Search