पनीर टिक्की चाट

साहित्य

  • गगनगिरी मलाई पनीर
  • बारीक चिरलेला कांदा
  • हिरव्या मिरच्या
  • कॉर्नफ्लोअर
  • ब्रेडक्रम्ब्स
  • लाल तिखट
  • मीठ
  • उकडलेला बटाटा
  • तेल
  • ताजे घट्ट दही
  • चिंचेची गोड चटणी
  • तिखट हिरवी चटणी
  • बारीक चिरलेला कांदा
  • कुरकुरीत शेव
  • सुक्या लिंबाच्या बिया
  • चाट मसाला

कृती

  1. सर्वप्रथम गगनगिरी म मलाई पनीर एका बाऊलमध्ये किसून घ्या.
  2. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, कॉर्नफ्लोअर आणि ब्रेडक्रम्ब्स घाला.
  3. लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून थोडे पाणी टाकून सर्व मिश्रण चांगले एकजीव करा.
  4. आता उकडलेला बटाटा किसून मिश्रणात घाला आणि पुन्हा चांगले मिक्स करा.
  5. मिश्रणाचे छोटे गोळे करून त्यांना गोल टिक्कीचा आकार द्या.
  6. पॅनमध्ये थोडे तेल गरम करून मध्यम आचेवर टिक्की दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय करा.
  7. तयार टिक्की प्लेटमध्ये काढून घ्या.
  8. सर्व्हिंग प्लेटमध्ये टिक्की ठेवून त्यावर ताजे घट्ट दही पसरवा.
  9. त्यावर चिंचेची गोड चटणी आणि तिखट हिरवी चटणी घाला.
  10. शेवटी बारीक चिरलेला कांदा, कुरकुरीत शेव आणि सुक्या लिंबाच्या बिया घालून सजवा.
  11. वरून चाट मसाला भुरभुरा आणि स्वादिष्ट गगनगिरी पनीर टिक्की चाट सर्व्ह करा.
Search