घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल पनीर हरा भरा कबाब – एस. आर. थोरात डेअरीच्या गगनगिरी पनीर वापरून!

साहित्य :
१ वाटी गगनगिरी ग्रेटेड पनीर (S.R. Thorat Dairy)
१ वाटी उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे
१ वाटी ब्रेडक्रम्ब्स
१ चमचा तांदळाचं पीठ
½ वाटी उकडलेली पालक (वाफवून, पाणी निथळलेली)
¼ वाटी उकडलेली ग्रीन पीस (हरभरा)
½ वाटी बारीक चिरलेली ग्रीन शिमला मिरची
१-२ हिरव्या मिरच्या
१ टिस्पून आले-लसूण पेस्ट
१ टिस्पून जिरे
२ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
½ टीस्पून हळद
½ टीस्पून गरम मसाला
चवीनुसार मीठ
काजू – सजावटीसाठी
तेल – कबाब फ्राय करण्यासाठी

कृती:
१. सर्वप्रथम, मिक्सरमध्ये पालक, ग्रीन पीस, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट आणि ग्रीन शिमला मिरची एकत्र करून एकसंध आणि जाडसर मिश्रण तयार करा.
२. हे हिरवे मिश्रण एका मोठ्या बाउलमध्ये काढा. त्यात गगनगिरी ग्रेटेड पनीर, उकडलेले बटाटे, ब्रेडक्रम्ब्स, तांदळाचं पीठ, कोथिंबीर, जिरे, हळद, गरम मसाला आणि मीठ घालून सर्व घटक नीट मिक्स करा. मिश्रण घट्ट आणि मळण्यास योग्य असावे.
३. तयार मिश्रणाचे छोटे-छोटे गोल किंवा अंडाकृती कबाब तयार करा. प्रत्येक कबाबवर अर्धा काजू दाबून लावा – यामुळे कबाब अधिक आकर्षक दिसतील.
४. आता एका पॅनमध्ये थोडं तेल गरम करा आणि या कबाब दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि खमंग होईपर्यंत शॅलो फ्राय करा.
५. गरमागरम पनीर हरा भरा कबाब टोमॅटो सॉस किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
टीप:
गगनगिरी ग्रेटेड पनीरमुळे कबाब्स नरम, मलईदार आणि चविष्ट होतात. ह्या कबाब्स पार्टी स्टार्टर, संध्याकाळचा नाश्ता किंवा खास पाहुण्यांसाठी योग्य पर्याय आहेत!

Search