आज बनवूया दिवाळीसाठी झटपट आणि पौष्टिक फुटाणे डाळीचे लाडू!
या स्वादिष्ट आणि हेल्दी लाडूंसाठी लागणार आहे फक्त काही सोपी साहित्यं आणि स. र. थोरात यांचे गगनगिरी तूप — जे देईल अप्रतिम चव आणि सुगंध!

साहित्य:
फुटाणे डाळ – 2 वाट्या (ड्राय रोस्ट केलेली)
पिठीसाखर – 1 वाटी
वेलची पावडर – ½ चमचा
गगनगिरी तूप – आवश्यकतेनुसार
बदाम आणि पिस्ता – सजावटीसाठी

कृती:
फुटाणे डाळ ड्राय रोस्ट करून बारीक ग्राइंड करा.
गगनगिरी तूप गरम करून घ्या.
ग्राइंड केलेली डाळ, वेलची पावडर आणि पिठीसाखर एकत्र चाळून घ्या.
त्यात तूप टाकून पीठ तयार करा आणि गोलगोल लाडू वळा.
बदाम व पिस्त्याने सजवा आणि आनंद घ्या!
या दिवाळीत बनवा झटपट, स्वादिष्ट आणि पौष्टिक लाडू — आपल्या कुटुंबासाठी खास!

Search