लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची फेव्हरेट – पनीर फ्रँकी!

मसालेदार स्टफिंग, खरपूस भाजलेली चपाती आणि खास SR Thorat चं मलाई पनीर यामुळे ही रेसिपी एकदम हटके आणि टेस्टी!

 

साहित्य :

 

डोसाठी:

मैदा – २ वाट्या

बेकिंग पावडर – ½ टीस्पून

गरम तेल – २ टेबलस्पून

काळी कलोंजी – 1 टीस्पून

गगनगिरी तूप – चपाती भाजण्यासाठी

 

स्टफिंगसाठी:

 

कांदा – 1 मध्यम (स्लाइस केलेला)

हिरवी, लाल, पिवळी शिमला मिरची – प्रत्येकी थोडी (स्लाइस केलेली)

काळी मिरी पावडर – ½ टीस्पून

रेड चिली सॉस – 1 टेबलस्पून

ग्रीन चिली सॉस – 1 टेबलस्पून

शेझवान चटणी – 1.5 टेबलस्पून

गगनगिरी मलाई पनीर (S.R. Thorat) – क्यूब्समध्ये कापलेले

टोमॅटो सॉस आणि मायोनीज – चपातीवर लावण्यासाठी

 

कृती:

 

एका भांड्यात मैदा, बेकिंग पावडर आणि गरम तेल एकत्र करून मऊ पीठ मळा.

पीठाचा एक गोळा घेऊन पोळीसारखा लाटून घ्या, वरून काळे तीळ (कलौंजी) पसरवा आणि हळूवारपणे पुन्हा लाटा जेणेकरून तीळ आत बसतील.

ही पोळी गगनगिरी तूप वापरून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजा.

दुसऱ्या पॅनमध्ये थोडं तेल गरम करून त्यात कापलेला कांदा आणि ढोबळी मिरची टाका आणि थोडी मऊ होईपर्यंत परता.

त्यात मिरीपूड, लाल चिली सॉस, हिरवी चिली सॉस आणि शेझवान चटणी टाका. नीट मिक्स करा.

आता त्यात गगनगिरी मलाई पनीरचे तुकडे टाका आणि सर्व साहित्य चांगलं मिसळा. १–२ मिनिटे परतून घ्या.

तयार पोळीवर आधी टोमॅटो सॉस आणि मेयोनीज लावा.

त्यावर गरम पनीरचं मिश्रण भरा, रोल करा आणि गरमागरम सर्व्ह करा!

 एकदा खाल्लं की दुसऱ्या बाइटवर थांबणं अशक्य!

 

Instagram:https://www.instagram.com/gagangiri_milkproducts/reel/DLAIFrDS__-/

Search