साहित्य:
- लापशी रवा – 1 वाटी
- Gagangiri तूप – 4 टीस्पून
- S.R. Thorat Shakti Milk – आवश्यकतेनुसार
- काजू – आवश्यकतेनुसार
- बदाम – आवश्यकतेनुसार
- साखर – चवीनुसार
- वेलची पावडर – ½ टीस्पून
- मीठ – चवीनुसार
- पाणी – आवश्यकतेनुसार
कृती:
सर्वप्रथम कुकरमध्ये 2 टीस्पून Gagangiri तूप गरम करून त्यात लापशी रवा घालून मंद आचेवर छान भाजून घ्या. लापशी व्यवस्थित भाजल्यानंतर त्यात थोडे पाणी आणि चवीनुसार मीठ घालून कुकरला एक शिट्टी घेऊन शिजवून घ्या.
आता एका पॅनमध्ये उरलेले 2 टीस्पून Gagangiri तूप गरम करून त्यात काजू आणि बदाम घालून गोल्डन होईपर्यंत भाजून घ्या. त्याच पॅनमध्ये S.R. Thorat Shakti Milk घालून दूध व्यवस्थित उकळून घ्या. दूध उकळल्यानंतर त्यात वेलची पावडर आणि चवीनुसार साखर घालून मिक्स करा.
आता त्यात शिजवलेली लापशी घालून सर्व मिश्रण चांगले एकजीव करून काही वेळ उकळू द्या. शेवटी भाजलेले काजू-बदाम घालून पुन्हा एकदा मिक्स करा.
गरमागरम लापशी रवा खीर बाऊलमध्ये सर्व्ह करा आणि कुटुंबासोबत या गोड, स्वादिष्ट आणि क्रीमी खिरीचा आनंद घ्या.