आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांती स्पेशल तिळाची चिक्की.या सोप्या आणि पारंपरिक रेसिपीमध्ये भाजलेले तीळ, गूळ, S. R. थोरात यांचे गगनगिरी तूप, साखर आणि इलायची पावडर वापरून घरच्या घरी खमंग व चविष्ट तिळाची चिक्की कशी तयार करायची ते पाहूया.ही तिळाची चिक्की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते आणि मकर संक्रांतीच्या सणासाठी अगदी परफेक्ट आहे.
साहित्य:
तीळ
गूळ
थोडेसे पाणी
S. R. थोरात यांचे गगनगिरी तूप
साखर
इलायची पावडर
कृती:
प्रथम पॅनमध्ये तीळ घालून ते मंद आचेवर लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
दुसऱ्या पॅनमध्ये S. R. थोरात यांचे गगनगिरी तूप घाला.
त्यात गूळ आणि थोडेसे पाणी घालून गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत शिजवून त्याचा पाक तयार करा.
पाकात साखर आणि इलायची पावडर घालून नीट मिसळा.
त्यानंतर भाजलेले तीळ पाकात घालून सर्व मिश्रण चांगले एकजीव करा.
तयार झालेले मिश्रण चॉपिंग बोर्डवर पसरवा.
थोडे थंड झाल्यावर पाहिजे त्या आकारात कापून घ्या.