आज आपण बनवणार आहोत संक्रांती स्पेशल पारंपरिक तिळाचे लाडू.
हे तिळाचे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात आणि मकर संक्रांतीसाठी खास असतात.
घरच्या घरी नक्की करून पाहा.
साहित्य :
तीळ – 1 कप
गूळ – 1 कप (किसलेला)
साखर – 2 टेबलस्पून
शेंगदाण्यांचा कूट – ½ कप
इलायची पावडर – ½ टीस्पून
S. R. थोरात यांचे गगनगिरी तूप – 2 टेबलस्पून
लाडू वळण्यासाठी थोडेसे तूप
कृती:
प्रथम पॅनमध्ये तीळ घेऊन ते मंद आचेवर लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
दुसऱ्या पॅनमध्ये गगनगिरी तूप घालून त्यात गूळ टाका व तो पूर्णपणे वितळवून पाक तयार करा.
पाकात साखर आणि इलायची पावडर घालून नीट मिसळा.
त्यानंतर भाजलेले तीळ आणि शेंगदाण्यांचा कूट घालून सर्व मिश्रण एकजीव करा.
गॅस बंद करून मिश्रण थोडेसे थंड होऊ द्या.
हाताला थोडेसे तूप लावून छोटे-छोटे लाडू वळून घ्या.
आणि तयार आहेत संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू — स्वादिष्ट, पौष्टिक आणि सर्वांना आवडणारे!