पनीर कोरमा

साहित्य:

  • S. R. थोरात गगनगिरी मलाई पनीर – आवश्यकतेनुसार
  • गगनगिरी दही – आवश्यकतेनुसार
  • कांदा – चिरलेला
  • टोमॅटो – प्युरी केलेले
  • काजू – आवश्यकतेनुसार
  • हिरव्या मिरच्या – आवश्यकतेनुसार
  • लसूण – आवश्यकतेनुसार
  • आले – आवश्यकतेनुसार
  • जिरे – आवश्यकतेनुसार
  • लाल मिरची पावडर – 1 टेबलस्पून
  • काश्मिरी लाल मिरची पावडर – 1 टेबलस्पून
  • गरम मसाला – 1 टेबलस्पून
  • हळद – 1 टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – आवश्यकतेनुसार
  • पाणी – आवश्यकतेनुसार
  • कोथिंबीर – गार्निशिंगसाठी

कृती:

  1. S. R. थोरात गगनगिरी मलाई पनीरचे तुकडे करून घ्या.
  2. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा ब्राउन होईपर्यंत फ्राय करा. त्यात लसूण, आले, हिरव्या मिरच्या आणि काजू घालून थोडे परतून घ्या.
  3. दुसऱ्या पॅनमध्ये थोडे तेल घेऊन पनीरचे तुकडे गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्या.
  4. मिक्सर जारमध्ये फ्राय केलेला कांदा, लसूण, आले, हिरव्या मिरच्या आणि काजू घ्या. त्यात गगनगिरी दही घालून सर्व मिश्रण बारीक ग्राइंड करून घ्या.
  5. कढईमध्ये तेल गरम करून जिरे घाला. त्यानंतर टोमॅटो प्युरी घालून तेल सुटेपर्यंत शिजवा.
  6. त्यामध्ये तयार केलेले कांद्याचे वाटण घालून व्यवस्थित मिक्स करा.
  7. लाल मिरची पावडर, काश्मिरी लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ घाला.
  8. सर्व मसाले एकत्र करून थोडे पाणी घाला आणि ग्रेव्ही काही वेळ शिजू द्या.
  9. ग्रेव्ही छान शिजल्यानंतर त्यात फ्राय केलेले पनीर घालून मिक्स करा.
  10. शेवटी कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा.
Search