बनाना शिरा

साहित्य:

  • केळी – २
  • रवा – १ वाटी
  • साखर – १ वाटी
  • ड्रायफ्रूट्स – १ वाटी
  • Gagangiri तूप – २ टेबलस्पून
  • S.R. Thorat Shakti Milk – आवश्यकतेनुसार
  • वेलची पावडर – आवश्यकतेनुसार

कृती:

  1. केळी सोलून त्याचे छोटे तुकडे करून घ्या.
  2. कढईमध्ये १ टेबलस्पून Gagangiri तूप गरम करून त्यात ड्रायफ्रूट्स घाला. ड्रायफ्रूट्सला हलका गोल्डन कलर आल्यावर ते बाहेर काढून घ्या.
  3. त्याच कढईमध्ये रवा घालून तूप आणि रवा व्यवस्थित एकजीव करून घ्या.
  4. दुसऱ्या पातेल्यात S.R. Thorat Shakti Milk घेऊन चांगले गरम करून घ्या.
  5. रवा भाजताना त्यात आणखी १ टेबलस्पून Gagangiri तूप घालून मिक्स करा.
  6. त्यात वेलची पावडर आणि गरम केलेले दूध घालून व्यवस्थित मिक्स करा.
  7. आता आवडीनुसार साखर घालून मिक्स करा.
  8. त्यात कट केलेली केळी घालून सर्वकाही एकजीव होईपर्यंत मिक्स करा.
  9. तयार Banana Sheera ड्रायफ्रूट्सने गार्निश करा.
Search