सणासुदीला गोडधोड बनवायचंय का?
घरी बनवा खास मँगो फ्लेवर खोया कोकोनट पेढा – स्वादिष्ट, पौष्टिक आणि अगदी सोपी रेसिपी!

साहित्य:
S. R. Thorat Activ Cow Milk – २ कप
Gagangiri Ghee – २ चमचे
Gagangiri Skimmed Milk Powder – १ कप
मँगो कस्टर्ड पावडर – २ चमचे
साखर – ½ कप (चवीनुसार)
वेलची पावडर – ½ चमचा
केसर – काही धागे
क्रश केलेला नारळ – ½ कप
खवा – आवश्यकतेनुसार

कृती:
प्रथम एका टोपा मध्ये S. R. Thorat Activ Cow Milk उकळून घ्या.
दुसऱ्या खोल पॅनमध्ये हे दूध ओतून त्यात Gagangiri Ghee घाला.
त्यात केसर घालून नीट मिक्स करा.
आता त्यात Gagangiri Skimmed Milk Powder आणि मँगो कस्टर्ड पावडर घालून ढवळत रहा.
मिश्रण घट्ट होऊ लागल्यावर त्यात साखर आणि वेलची पावडर घालून नीट मिसळा.
थोडं थंड झाल्यावर ते मिश्रण प्लेटमध्ये काढा आणि त्यात क्रश केलेला नारळ मिसळा.
नंतर त्यात खवा मळून छोटे गोल पेढे तयार करा.
तुमचे स्वादिष्ट मँगो फ्लेवर खोया कोकोनट पेढे तयार आहेत!

Search