आज आपण बनवणार आहोत लहान मुलांना खूप आवडणारा घरगुती पनीर पिझ्झा. या पिझ्झामध्ये वापरले आहे गगनगिरी मलाई पनीर जे देईल पिझ्झाला स्पेशल स्वाद आणि पौष्टिकता.
साहित्य :
गगनगिरी मलाई पनीर – बारीक cubes मध्ये कापलेले
गगनगिरी बटर – १ चमचा
मीठ – चवीनुसार
रेड चिली पावडर – १ टीस्पून
पिझ्झा base – १
पिझ्झा सॉस – २ चमचे
रेड चिली सॉस – १ चमचा
शेझवान सॉस – १ चमचा
मेयॉनीज – १ चमचा
मोजरेला चीज – भरपूर
शिमला मिरची (हिरवी, पिवळी, लाल) – बारीक कापलेली
कांदा – बारीक कापलेला
टोमॅटो – बारीक कापलेला
चिली फ्लेक्स – थोडेसे
ओरिगॅनो – थोडं
कृती :
पनीर फ्राय करणे
एका पॅनमध्ये गगनगिरी बटर गरम करून त्यात पनीर cubes टाका.
त्यावर मीठ आणि रेड चिली पावडर घालून गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करा.
कढई प्रीहीट करणे
एका कढईत भरपूर मीठ टाकून सगळ्या बाजूंनी पसरवा.
त्यावर एक प्लेट ठेवून झाकण लावा आणि थोडावेळ गरम होऊ द्या.
पिझ्झा बेस तयार करणे
पिझ्झा base घ्या आणि त्यावर पिझ्झा सॉस, रेड चिली सॉस, शेझवान सॉस आणि मेयॉनीज लावा.
आता त्यावर मोजरेला चीज, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो घालून spread करा.
त्यावर फ्राय केलेले पनीर cubes ठेवा.
परत वरून मोजरेला चीज, चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो टाका.
पिझ्झा बेक करणे
गरम केलेल्या कढईत प्लेटवर थोडं बटर लावून पिझ्झा ठेवा.
झाकण ठेवून १५-२० मिनिटे बेक करा.