आज आपण बनवणार आहोत झटपट, पौष्टिक आणि चविष्ट दही टोस्ट!
Gagangiri दही आणि बटरने बनलेला हा ब्रेकफास्ट कुरकुरीत, हेल्दी आणि खूपच टेस्टी आहे.
मुले असो किंवा मोठे – सर्वांना नक्की आवडेल. रायता किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह केला की मजा दुप्पट!

साहित्य:
Gagangiri दही – 1 कप
बारीक रवा – 2 चमचे
शिमला मिरची – ½ कप (बारीक चिरलेली)
कांदा – 1 (बारीक चिरलेला)
टोमॅटो – 1 (बारीक चिरलेला)
हिरवी मिरची – 1 (बारीक चिरलेली)
ब्रेड स्लाईस – 4
Gagangiri बटर – 2 चमचे
मीठ – चवीनुसार

Process:
एका बाऊलमध्ये Gagangiri दही, रवा, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि मीठ टाकून नीट मिक्स करा.
ब्रेड स्लाईस घेऊन त्यावर हे तयार स्टफिंग नीट स्प्रेड करा.
पॅनमध्ये Gagangiri बटर टाकून गरम करा.
त्यात ब्रेड स्लाईस ठेवून शॅलो फ्राय करा. दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या.
वरून थोडं बटर लावा.
गरमागरम दही टोस्ट रायता किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.

Search