आज घरच्या घरी बनवूया ढाबा स्टाईलचा झणझणीत आणि बटरने भरलेला बटर पनीर मसाला — जो एकदम रेस्टॉरंट स्टाईल लागतो!
ही रेसिपी खास आहे कारण यात वापरले आहे गगनगिरी बटर आणि पनीर, जे बटर पनीरला देतात एकदम रिच आणि स्पेशल टच!
साहित्य:
टोमॅटो, आलं, लसूण, हिरवी मिरची
कांदा, कोथिंबीर, मगज बी, काजू
लाल तिखट, हळद, गरम मसाला, साखर, धणे पावडर
गगनगिरी पनीर क्यूब्स
गगनगिरी बटर आणि तेल
जिरे, खडे मसाले
कस्तुरी मेथी, मीठ, पाणी
फ्रेश क्रीम (ऐच्छिक)
कृती:
सर्व घटक एकत्र करून मिक्सरमध्ये पेस्ट तयार करा.
गगनगिरी बटरमध्ये पनीर फ्राय करून बाजूला ठेवा.
त्याच पॅनमध्ये मसाला परतून, पेस्ट टाकून, चवीनुसार मीठ, कस्तुरी मेथी आणि पाणी घालून एक वाफ काढा.
शेवटी पनीर टाकून मिक्स करा आणि गार्निश करा क्रीम व कोथिंबिरीने.