नाश्त्यासाठी झटपट व चविष्ट असा गगनगिरी मलई पनीर ग्रिल्ड सँडविच आजच घरी बनवा! या पनीर सँडविच रेसिपीमध्ये वापरले आहे SR Thorat यांचे स्वादिष्ट गगनगिरी मलई पनीर, जे या सँडविचला एकदम खास चव देते.
या रेसिपीमध्ये आपण कांदा, बटाटा, कोथिंबीर व चवीनुसार मसाले वापरून तयार केलेली भाजी, ब्रेडवर पसरवून त्यावर किसलेलं गगनगिरी पनीर व चीझ टाकून परफेक्ट क्रिस्पी ग्रिल्ड सँडविच बनवले आहे
साहित्य:
२ ब्रेड स्लाइस
१ बटाटा (उकडलेला व चिरलेला)
१ कांदा (बारीक चिरलेला)
२ चमचे तेल
½ टीस्पून मोहरी
थोडीशी हळद
५-६ कढीपत्ता
१ हिरवी मिरची (बारीक चिरलेली)
कोथिंबीर
गगनगिरी मलई पनीर (किसून)
चीझ
बारीक शेव
गगनगिरी बटर
कृती:
कढईत तेल गरम करून त्यात मोहरी टाका.
मोहरी तडतडल्यावर कांदा, कढीपत्ता आणि हळद टाका व परतवा.
त्यात मॅश केलेले बटाटे, मीठ, हिरवी मिरची व कोथिंबीर घालून नीट मिक्स करा.
दोन ब्रेड स्लाइस घ्या, त्यावर तयार भाजी पसरवा.
त्यावर गगनगिरी मलई पनीर, चीज आणि शेव शिंपडा.
दुसरी स्लाइस ठेवून सँडविच तयार करा.
वरून गगनगिरी बटर लावून तव्यावर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजा.
मधोमध कापून हिरवी चटणी/सॉससोबत गरमागरम सर्व्ह करा!