संध्याकाळच्या गरम चहासोबत काहीतरी टेस्टी आणि कुरकुरीत खायचंय? आज बनवूया अगदी सोप्या पद्धतीने पालक स्टिक्स
साहित्य:
पालक – आवश्यकतेनुसार (पाने)
मैदा – 1 वाटी
जिरे – 1 टीस्पून
आले पेस्ट – 1 टीस्पून
लसूण – 4–5 पाकळ्या
हिरवी मिरची – 1–2
कोथिंबीर – आवडीनुसार
तीळ – 1 टीस्पून
ओवा – ½ टीस्पून
मीठ – चवीनुसार
हळद – 1 टेबलस्पून
लाल तिखट – 1 टेबलस्पून
तेल – मोहनसाठी व तळण्यासाठी

चहासाठी साहित्य:
पाणी – आवश्यकतेनुसार
चहापावडर – गरजेनुसार
वेलदोडे – 3 ते 4
S. R. थोरात यांचे शक्ती मिल्क – आवश्यकतेनुसार
साखर – चवीनुसार
आले पेस्ट – थोडीशी

कृती:
प्रथम एका सॉसपॅनमध्ये पाणी उकळायला ठेवा.
पाणी गरम झाल्यावर त्यात पालकाची पाने टाका व पालक उकळून घ्या.
उकळलेला पालक लगेच गार पाण्यात टाका.
मिक्सर जारमध्ये उकळलेला पालक, जिरे, आले पेस्ट, लसूण, हिरवी मिरची व कोथिंबीर घालून गुळगुळीत प्युरी तयार करा.
एका मोठ्या बाऊलमध्ये मैदा चाळून घ्या.
त्यात तीळ, हाताने बारीक केलेला ओवा, मीठ, हळद, लाल तिखट व तेल घालून मिक्स करा.
आता तयार पालक प्युरी घालून मऊ डो मळून घ्या.
डोचा गोळा घेऊन पोळीप्रमाणे पातळ लाटून घ्या.
लाटलेली पोळी स्ट्रिप्सच्या आकारात कापा.
कढईत तेल गरम करून पालक स्टिक्स सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
चहा तयार करण्याची कृती:
पातेल्यात पाणी, चहापावडर व वेलदोडे उकळवा.
त्यात S. R. थोरात यांचे शक्ती मिल्क घाला.
उकळी आल्यावर साखर व थोडी आले पेस्ट घाला.
चहा गाळून घ्या.

Search