आज आपण बनवणार आहोत अगदी रेस्टॉरंटसारखं टेस्टी आणि स्पेशल कढाई पनीर

साहित्य:
S.R. थोरात गगनगिरी मलाई पनीर – चौकोनी काप
कांदा – बारीक चिरलेला
टोमॅटो – बारीक चिरलेले
हिरवी मिरची – 2
लसूण – 5 ते 6 पाकळ्या
कोथिंबीर – थोडी
काजू-मगजबी पेस्ट – 2 टेबलस्पून
लाल, पिवळी व हिरवी शिमला मिरची – काप
कांदा – काप
गगनगिरी तूप – 2 टेबलस्पून
तेल – आवश्यकतेनुसार
मीठ – चवीनुसार
साखर – चिमूटभर
हळद – ½ टीस्पून
किचन किंग मसाला – 1 टीस्पून
लाल तिखट – चवीनुसार
खडे मसाले (भाजून क्रश केलेले):
धने
जिरे
तीळ
काळी मिरी

कृती:
धने, जिरे, तीळ आणि काळी मिरी लो फ्लेमवर भाजून घ्या व क्रश करून ठेवा.
पॅनमध्ये थोडं तेल गरम करून पनीर शॅलो फ्राय करून बाजूला ठेवा.
कढईत गगनगिरी तूप घालून त्यात जिरे व खडे मसाले टाका.
बारीक चिरलेला कांदा टाकून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
हिरवी पेस्ट, टोमॅटो, मीठ आणि थोडी साखर घालून परतून एक वाफ येऊ द्या.
त्यात किचन किंग मसाला, हळद व काजू पेस्ट टाकून मिक्स करा व पुन्हा वाफ द्या.
तेल सुटल्यावर थोडं पाणी घालून ग्रेव्ही तयार करा.
वेगळ्या पॅनमध्ये शिमला मिरची, कांदा, पनीर, क्रश मसाला, लाल तिखट व मीठ परतून घ्या.
हे मिश्रण ग्रेव्हीत टाकून हलक्या हाताने मिक्स करा.
वरून कोथिंबीर घालून गार्निश करा.

Search