सावजी पनीर

साहित्य:

  • SR Thorat यांचे गगनगिरी मलाई पनीर– 250 ग्रॅम
  • कांदा – 2
  • टोमॅटो – 2
  • आलं-लसूण पेस्ट – 1 टीस्पून
  • सावजी मसाला – 1½ टेबलस्पून
  • लाल तिखट – 1 टीस्पून
  • हळद – ¼ टीस्पून
  • गरम मसाला – ½ टीस्पून
  • तेल – 2 टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • कोथिंबीर

 

कृती:

  1. कढईत तेल गरम करून कांदा परतून घ्या.
  2. आलं-लसूण पेस्ट आणि टोमॅटो घालून शिजवा.
  3. सावजी मसाला, लाल तिखट, हळद आणि मीठ घालून तेल सुटेपर्यंत भाजा.
  4. थोडं पाणी घालून ग्रेव्ही तयार करा.
  5. पनीर आणि गरम मसाला घालून 5 मिनिटे शिजवा.
  6. वरून कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा
Search