खुसखुशीत खाजा

साहित्य:

पिठासाठी:

  • मैदा – 2 वाट्या
  • मीठ – चवीनुसार
  • तूप – 5 ते 6 चमचे (मोहनासाठी)
  • पाणी – आवश्यकतेनुसार
  • पाकासाठी:
  • साखर – 2 वाट्या
  • पाणी – 2 वाट्या
  • केसर – थोडीशी
  • वेलची पावडर – ½ चमचा
  • फूड कलर – ऐच्छिक
  • लिंबाचा रस – ½ चमचा
  • इतर साहित्य:
  • कॉर्नफ्लोर – 2 चमचे
  • तूप – 2 चमचे (पोळ्यांवर लावण्यासाठी)
  • तेल – तळण्यासाठी

 

कृती:

पीठ तयार करणे:

दोन वाट्या मैदा घ्या, त्यात मीठ आणि पाच ते सहा चमचे तुपाचं मोहन घालून नीट मिक्स करा.

नंतर पाणी टाकून मऊसूर पीठ मळा.

हे पीठ झाकून 10 ते 15 मिनिटे भिजू द्या.

पाक तयार करणे:

एका भांड्यात साखर आणि पाणी घाला.

त्यात केसर, वेलची पावडर आणि फूड कलर टाका.

उकळी येऊ द्या आणि त्यात थोडासा लिंबाचा रस टाका.

हलक्या तारेसारखा पाक तयार झाल्यावर गॅस बंद करा.

खाजा बनवणे:

भिजवलेलं पीठ घेऊन पोळ्या लाटा.

प्रत्येक पोळीवर दोन चमचे तूप आणि दोन चमचे कॉर्नफ्लोर एकत्र करून लावा.

अशा प्रकारे सर्व पोळ्या एकावर एक ठेवा आणि घट्ट रोल करा.

त्या रोलचे छोटे छोटे तुकडे (पीसेस) करा.

तळणे:

तेल गरम करून खाजेचे तुकडे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.

पाकात भिजवणे:

तळलेले खाजे गरम पाकात टाका आणि थोडा वेळ भिजू द्या. 

Search