टेस्टी बटर मॅगी

साहित्य:

  • मॅगी – १ पॅक
  • टोमॅटो – १
  • स्प्रिंग ऑनियन – आवश्यकतेनुसार
  • लाल, पिवळी आणि हिरवी शिमला मिरची – आवश्यकतेनुसार
  • कांदा – १, बारीक चिरलेला
  • लसूण – क्रश केलेला
  • हिरवी मिरची – १–२
  • Gagangiri Butter – आवश्यकतेनुसार
  • मॅगी मॅजिक मसाला – १ पॅक
  • टोमॅटो सॉस – आवश्यकतेनुसार
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – थोडे
  • पाणी – आवश्यकतेनुसार

कृती:

  1. कढईमध्ये पाणी गरम करून त्यात चवीनुसार मीठ आणि थोडे तेल घाला.
  2. पाणी उकळल्यानंतर त्यात मॅगी घालून काही मिनिटे शिजवून घ्या.
  3. मॅगी शिजल्यानंतर ती एका बाऊलमध्ये काढून थोडी थंड होण्यासाठी ठेवा.
  4. पॅनमध्ये Gagangiri Butter घालून वितळवून घ्या.
  5. त्यात क्रश केलेला लसूण, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा आणि लाल, पिवळी व हिरवी शिमला मिरची घालून परतून घ्या.
  6. आता चवीनुसार मीठ, टोमॅटो सॉस आणि मॅगी मॅजिक मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा.
  7. त्यात शिजवलेली मॅगी घालून सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत मिक्स करा.
  8. वरून बारीक चिरलेला स्प्रिंग ऑनियन घालून गार्निश करा.
Search