साहित्य:
- S. R. थोरात गगनगिरी मलाई पनीर – आवश्यकतेनुसार
- गगनगिरी दही – आवश्यकतेनुसार
- कांदा – चिरलेला
- टोमॅटो – प्युरी केलेले
- काजू – आवश्यकतेनुसार
- हिरव्या मिरच्या – आवश्यकतेनुसार
- लसूण – आवश्यकतेनुसार
- आले – आवश्यकतेनुसार
- जिरे – आवश्यकतेनुसार
- लाल मिरची पावडर – 1 टेबलस्पून
- काश्मिरी लाल मिरची पावडर – 1 टेबलस्पून
- गरम मसाला – 1 टेबलस्पून
- हळद – 1 टेबलस्पून
- मीठ – चवीनुसार
- तेल – आवश्यकतेनुसार
- पाणी – आवश्यकतेनुसार
- कोथिंबीर – गार्निशिंगसाठी
कृती:
- S. R. थोरात गगनगिरी मलाई पनीरचे तुकडे करून घ्या.
- पॅनमध्ये तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा ब्राउन होईपर्यंत फ्राय करा. त्यात लसूण, आले, हिरव्या मिरच्या आणि काजू घालून थोडे परतून घ्या.
- दुसऱ्या पॅनमध्ये थोडे तेल घेऊन पनीरचे तुकडे गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्या.
- मिक्सर जारमध्ये फ्राय केलेला कांदा, लसूण, आले, हिरव्या मिरच्या आणि काजू घ्या. त्यात गगनगिरी दही घालून सर्व मिश्रण बारीक ग्राइंड करून घ्या.
- कढईमध्ये तेल गरम करून जिरे घाला. त्यानंतर टोमॅटो प्युरी घालून तेल सुटेपर्यंत शिजवा.
- त्यामध्ये तयार केलेले कांद्याचे वाटण घालून व्यवस्थित मिक्स करा.
- लाल मिरची पावडर, काश्मिरी लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ घाला.
- सर्व मसाले एकत्र करून थोडे पाणी घाला आणि ग्रेव्ही काही वेळ शिजू द्या.
- ग्रेव्ही छान शिजल्यानंतर त्यात फ्राय केलेले पनीर घालून मिक्स करा.
- शेवटी कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा.