डाळ तडका

साहित्य:

  • तूर डाळ – आवश्यकतेनुसार
  • मूग डाळ – आवश्यकतेनुसार
  • S. R. थोरात गगनगिरी तूप – 4 टेबलस्पून
  • टोमॅटो – कट केलेले
  • आलं-लसूण पेस्ट – आवश्यकतेनुसार
  • हिरव्या मिरच्या – आवश्यकतेनुसार
  • लसूण – आवश्यकतेनुसार
  • मोहरी – आवश्यकतेनुसार
  • जिरे – आवश्यकतेनुसार
  • लाल मिरच्या – आवश्यकतेनुसार
  • कढीपत्ता – आवश्यकतेनुसार
  • हिंग – चिमूटभर
  • लाल मिरची पावडर – आवश्यकतेनुसार
  • हळद – आवश्यकतेनुसार
  • मीठ – चवीनुसार
  • साखर – आवडीनुसार
  • तेल – आवश्यकतेनुसार
  • पाणी – आवश्यकतेनुसार

कृती:

  1. एका बाउलमध्ये तूर डाळ आणि मूग डाळ घेऊन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
  2. कुकरमध्ये धुतलेल्या डाळी, टोमॅटो, लसूण, आलं-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, आवडीनुसार साखर, हळद आणि 2 टेबलस्पून S. R. थोरात गगनगिरी तूप घाला.
  3. त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून कुकरला एक शिट्टी येऊ द्या.
  4. डाळ शिजल्यानंतर ती व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  5. तडका पॅनमध्ये थोडे तेल आणि 2 टेबलस्पून S. R. थोरात गगनगिरी तूप गरम करा.
  6. त्यामध्ये लसूण, मोहरी, जिरे, लाल मिरच्या, कढीपत्ता, हिंग आणि लाल मिरची पावडर घालून छान फोडणी तयार करा.
  7. तयार केलेली फोडणी शिजलेल्या डाळीत घालून व्यवस्थित मिक्स करा.
  8. गरमागरम डाळ तडका प्लेटमध्ये सर्व्ह करा.
Search