दही स्पॉन्जी डोसा

साहित्य:

  • S. R. थोरात गगनगिरी दही – आवश्यकतेनुसार
  • रवा – आवश्यकतेनुसार
  • भिजवलेले पोहे – आवश्यकतेनुसार
  • इनो – आवश्यकतेनुसार
  • मीठ – चवीनुसार
  • S. R. थोरात गगनगिरी तूप – आवश्यकतेनुसार
  • तेल – आवश्यकतेनुसार
  • पाणी – आवश्यकतेनुसार
  • बटाट्याची चटणी – सर्व्ह करण्यासाठी

कृती:

  1. एका बाउलमध्ये S. R. थोरात गगनगिरी दही, रवा आणि भिजवलेले पोहे घेऊन व्यवस्थित मिक्स करा.
  2. त्यामध्ये थोडे पाणी घालून मिश्रण एकजीव करा आणि काही वेळ मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवा.
  3. मॅरिनेट झालेले मिश्रण मिक्सर जारमध्ये घेऊन स्मूथ होईपर्यंत ब्लेंड करा.
  4. तयार मिश्रण पुन्हा बाउलमध्ये काढून त्यात चवीनुसार मीठ आणि इनो घाला.
  5. वरून थोडे पाणी घालून मिश्रण हलक्या हाताने मिक्स करा.
  6. तवा गरम करून त्यावर थोडे तेल लावा. तयार मिश्रण तव्यावर घेऊन हलक्या हाताने गोलाकार पसरवा.
  7. वरून थोडे S. R. थोरात गगनगिरी तूप घालून डोसा दोन्ही बाजूंनी गोल्डन आणि क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्या.
  8. गरमागरम दही स्पॉन्जी डोसा बटाट्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
Search