गणपती बाप्पाचे सर्वात आवडते गोडधोड म्हणजे उकडीचे मोदक!
S. R. Thorat यांचे गगनगिरी घी आणि Activ Cow Milk वापरून बनवलेले हे पारंपरिक मोदक चवीला अप्रतिम लागतात.

साहित्य:
गगनगिरी घी – 2 चमचे (S. R. Thorat)
नारळ किस – 1 वाटी
गूळ – 1 वाटी
वेलदोड्याची पूड – अर्धा चमचा
मीठ – चवीनुसार
पाणी – 1 कप
Activ Cow Milk – 1 कप (S. R. Thorat)
गगनगिरी घी – 1 चमचा (पिठासाठी)
तांदळाचे पीठ – 1 वाटी
हळदीची पाने / केळीची पाने – वाफवण्यासाठी
केशर – थोडं (गार्निशसाठी)

कृती :
एका पॅनमध्ये गगनगिरी घी गरम करून त्यात नारळाचा किस घाला.
थोडं परतून झाल्यावर त्यात गूळ घालून मिश्रण तयार करा.
त्यात वेलदोड्याची पूड आणि थोडं मीठ घालून सारण शिजवून घ्या.
दुसऱ्या भांड्यात पाणी गरम करा, त्यात Activ Cow Milk आणि गगनगिरी घी घाला.
उकळी आल्यावर त्यात तांदळाचे पीठ टाकून नीट मिक्स करून झाकण ठेऊन शिजवा.
तयार पिठ प्लेटमध्ये काढून तुपाने हाताला लावून मळून घ्या.
लहान उंडे घेऊन मोदक मेकरमध्ये पसरवा, त्यात तयार सारण भरा आणि बंद करा.
अशाच प्रकारे सर्व मोदक तयार करा.
एका पातेल्यात पाणी गरम करून वरती चाळणी ठेवा, त्यावर पाने ठेवून मोदक मांडून घ्या.
त्यावर केशर शिंपडा, झाकण ठेवा आणि वाफवून शिजवा.
तयार मोदक प्लेटमध्ये काढून गगनगिरी घी घालून फॅमिलीसोबत एन्जॉय करा!
👉 बाप्पाचे फेव्हरेट उकडीचे मोदक तयार!

Search