दिवाळी स्पेशल सांजोरी

 

साहित्य:

  • गगनगिरी तूप – 2 चमचे
  • बारीक रवा – 1½ वाटी
  • गूळ – 1 वाटी (बारीक केलेला)
  • पाणी – ½ वाटी
  • वेलची पावडर – ½ चमचा
  • गव्हाचं पीठ – 2 वाट्या
  • मैदा – ½ वाटी
  • बेसन पीठ – 2-3 चमचे
  • बारीक रवा – ½ वाटी
  • मीठ – चवीनुसार
  • गरम तेलाचं मोहन – 2-3 चमचे
  • गरम पाणी – पीठ मळण्यासाठी
  • तळण्यासाठी तेल

 

कृती:

 एका पॅनमध्ये गगनगिरी तूप गरम करून त्यात बारीक रवा घाला आणि सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.

 दुसऱ्या पॅनमध्ये पाणी घालून त्यात बारीक केलेला गूळ मिसळा. गूळ पूर्णपणे विरघळल्यावर गाळून घ्या.

 त्यात भाजलेला रवा टाका आणि नीट मिक्स करा.

 नंतर वेलची पावडर टाकून सारण एकजीव करून 4-5 तास बाजूला ठेवा.

 दुसऱ्या भांड्यात गव्हाचं पीठ, मैदा, बेसन पीठ, रवा, मीठ, मोहन आणि गरम पाणी घालून डो तयार करा.

 डो 10 मिनिटे झाकून ठेवा.

 तयार सारणाचे छोटे गोळे बनवा, ते पिठात भरून उंडे तयार करा आणि पुऱ्या लाटून घ्या.

 गरम तेलात पुऱ्या सोनेरी रंग येईपर्यंत तळा.

 मस्त खुसखुशीत रवा गुळाची सांजोरी सर्व्ह करा आणि दिवाळीचा आनंद घ्या! 

Search