साहित्य:
- केळी – २
- रवा – १ वाटी
- साखर – १ वाटी
- ड्रायफ्रूट्स – १ वाटी
- Gagangiri तूप – २ टेबलस्पून
- S.R. Thorat Shakti Milk – आवश्यकतेनुसार
- वेलची पावडर – आवश्यकतेनुसार
कृती:
- केळी सोलून त्याचे छोटे तुकडे करून घ्या.
- कढईमध्ये १ टेबलस्पून Gagangiri तूप गरम करून त्यात ड्रायफ्रूट्स घाला. ड्रायफ्रूट्सला हलका गोल्डन कलर आल्यावर ते बाहेर काढून घ्या.
- त्याच कढईमध्ये रवा घालून तूप आणि रवा व्यवस्थित एकजीव करून घ्या.
- दुसऱ्या पातेल्यात S.R. Thorat Shakti Milk घेऊन चांगले गरम करून घ्या.
- रवा भाजताना त्यात आणखी १ टेबलस्पून Gagangiri तूप घालून मिक्स करा.
- त्यात वेलची पावडर आणि गरम केलेले दूध घालून व्यवस्थित मिक्स करा.
- आता आवडीनुसार साखर घालून मिक्स करा.
- त्यात कट केलेली केळी घालून सर्वकाही एकजीव होईपर्यंत मिक्स करा.
- तयार Banana Sheera ड्रायफ्रूट्सने गार्निश करा.