बाल गणेशाचं फेव्हरेट स्वीट – मोदक – बनवा घरच्या घरी, गगनगिरी घी आणि मिल्क पावडरच्या खास चवीसह.
या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवणार आहोत सोप्या स्टेप-बाय-स्टेप पद्धतीने तळलेले मोदक बनवण्याची रेसिपी.
पीठाची मळणीपासून ते गुळ-नारळाच्या सारणाच्या गोडीपर्यंत, प्रत्येक टप्पा काळजीपूर्वक दाखवला आहे, जेणेकरून तुमचे मोदक परफेक्ट आणि स्वादिष्ट होतील.
साहित्य :
पीठासाठी:
मैदा – २ वाट्या
रवा – ½ वाटी
मीठ – चवीनुसार
पाणी – गरम आणि नंतर साधं (पीठ मळण्यासाठी)
सारणासाठी:
ओला नारळ – २ वाट्या (किसलेला)
गूळ – १ वाटी (किसलेला)
वेलची पूड – ½ टीस्पून
S.R. Thorat यांचं गगनगिरी तूप – २ टेबलस्पून
S.R. Thorat यांची गगनगिरी मिल्क पावडर – २ टेबलस्पून
तळण्यासाठी:
तेल – आवश्यकतेनुसार
कृती :
१. पीठ मळणे:
एका मोठ्या बाउलमध्ये मैदा, रवा आणि मीठ घाला.
आधी थोडं गरम पाणी घालून मिक्स करा, नंतर आवश्यकतेनुसार साधं पाणी घालून मऊसर पीठ मळा.
मळलेलं पीठ १० मिनिटे झाकून भिजत ठेवा.
२. सारण तयार करणे:
एका पॅनमध्ये S.R. Thorat यांचं गगनगिरी तूप गरम करा.
त्यात किसलेला ओला नारळ टाका आणि मध्यम आचेवर हलका परतून घ्या.
नारळ थोडा भाजल्यावर त्यात किसलेला गूळ आणि वेलची पूड घाला.
मिश्रण नीट एकत्र होईपर्यंत परता.
शेवटी S.R. Thorat यांची गगनगिरी मिल्क पावडर घालून हलक्या हाताने मिक्स करा.
तयार सारण गार होऊ द्या.
३. मोदक तयार करणे:
भिजवलेल्या पिठाचे छोटे उंडे घ्या.
प्रत्येक उंडा लाटून पातळ पोळी तयार करा.
दाखवल्याप्रमाणे वर्तुळाकार कापून घ्या.
मधोमध सारण ठेवा आणि हातांनी मोदकाचा आकार द्या.
४. मोदक तळणे:
कढईत तेल गरम करा.
तयार मोदक एक-एक करून गरम तेलात सोडा.
मध्यम आचेवर मोदक सोनसळी (गोल्डन ब्राउन) रंगाचे होईपर्यंत तळा.
तळलेले मोदक कागदी टॉवेलवर काढा जेणेकरून अतिरिक्त तेल निघून जाईल.
५. सर्व्हिंग:
गरमागरम, सुगंधी आणि स्वादिष्ट मोदक प्लेटमध्ये वाढा आणि टेस्टच्या स्वीट मोदकांचा आनंद घ्या!

Search