आरोग्यदायी, चविष्ट आणि प्रोटीनने भरपूर अशी खास महाराष्ट्रीयन पनीर रेसिपी – पनीर ठेचा!
S.R. Thorat यांच्या गगनगिरी मलाई पनीरपासून बनवलेली ही रेसिपी तुम्हाला देईल पारंपरिक चव आणि फिटनेसचा जबरदस्त संगम.
साहित्य
S.R. Thorat गगनगिरी मलाई पनीर – 250 ग्रॅम (क्यूब्समध्ये कट केलेले)
हिरव्या मिरच्या – 5-6
लसूण पाकळ्या – 7-8
कढीपत्ता – 8-10 पाने
जिरे – 1 टीस्पून
आलं – 1 टीस्पून (बारीक केलेले)
शेंगदाणे – 2 टेबलस्पून
कोथिंबीर – 2 टेबलस्पून (बारीक चिरलेली)
मीठ – चवीनुसार
तेल – 2-3 टेबलस्पून
मेयोनीज सॉस – 1 टेबलस्पून
टोमॅटो सॉस – 1 टेबलस्पून
कृती
गंगागिरी मलाई पनीरचे छोटे क्यूब्स कापा आणि बाजूला ठेवा.
एका कढईत 1 टेबलस्पून तेल गरम करून त्यात हिरव्या मिरच्या आणि लसूण घालून हलके भाजा.
त्यात कढीपत्ता, जिरे, बारीक केलेले आलं आणि शेंगदाणे टाकून सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ घालून हलके मिक्स करा.
हे मिश्रण खलबत्त्यात काढून ठेचा करून घ्या.
ठेचलेले मिश्रण एका बाऊलमध्ये काढा, त्यात थोडे तेल टाकून एकजीव करा.
पनीर क्यूब्सवर हा ठेचा समान प्रमाणात लावा.
एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करा, त्यात कोट केलेले पनीर ठेवा, झाकण ठेवा आणि शॅलो फ्राय करा.
शिजल्यानंतर पनीर प्लेटमध्ये काढा, त्यावर मेयोनीज सॉस आणि टोमॅटो सॉस घालून सर्व्ह करा.