या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत सर्वांचा फेव्हरेट पनीर घोटाळा – तोही गगनगिरी पनीर वापरून!
बटर, मसाले आणि शिजवलेल्या टोमॅटो-कांद्याने तयार झालेला हा घोटाळा चविष्ट आणि झणझणीत लागतो.
घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवा आणि सगळ्यांना खुश करा!

साहित्य:
गगनगिरी पनीर – smashed/चिरलेले
२ टेबलस्पून तेल
१ टेबलस्पून बटर
१ टीस्पून जिरे
१ मध्यम कांदा – बारीक चिरलेला
१ टोमॅटो – बारीक चिरलेला
½ शिमला मिरची – बारीक चिरलेली
½ टीस्पून हळद
१ टीस्पून लाल तिखट
½ टीस्पून गरम मसाला
½ टीस्पून मटन मसाला (ऐच्छिक)
चवीनुसार मीठ
¼ कप पाणी
१ टीस्पून कस्तुरी मेथी
किसलेले बटर – सर्व्ह करताना वरून

कृती:
एका कढईत तेल गरम करून त्यात बटर आणि जिरे घाला.
जिरे तडतडल्यावर त्यात चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून मध्यम आचेवर परतून घ्या.
कांदा-टोमॅटो मऊसर आणि खमंग झाल्यावर त्यात शिमला मिरची घालून थोडंसं परतून घ्या.
नंतर त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला, मटन मसाला आणि मीठ घालून नीट परतून घ्या.
त्यात थोडं पाणी घालून एक वाफ येऊ द्या.
आता smashed गगनगिरी पनीर त्यात घालून नीट मिक्स करा.
त्यावर कस्तुरी मेथी आणि थोडं पाणी घालून एकसंध मिश्रण करून घ्या.
शेवटी वरून किसलेलं बटर घालून एक वाफ आणा.

Search