आंब्याचा शिरा

साहित्य:

  • रवा – आवश्यकतेनुसार
  • आंब्याचा रस – आवश्यकतेनुसार
  • S. R. थोरात शक्ती मिल्क – आवश्यकतेनुसार
  • S. R. थोरात गगनगिरी तूप – आवश्यकतेनुसार
  • साखर – आवडीनुसार
  • काजू – आवश्यकतेनुसार
  • बदाम – आवश्यकतेनुसार
  • इलायची पावडर – थोडीशी
  • गुलाबाच्या पाकळ्या – गार्निशिंगसाठी

कृती:

  1. S. R. थोरात शक्ती मिल्क एका भांड्यात घेऊन छान गरम करून बाजूला ठेवा.
  2. कढईमध्ये गगनगिरी तूप घालून काजू आणि बदाम गोल्डन होईपर्यंत भाजून घ्या. भाजलेले ड्रायफ्रूट्स प्लेटमध्ये काढून ठेवा.
  3. त्याच कढईमध्ये रवा घालून मंद आचेवर छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्या.
  4. आंब्याचा रस मिक्सर जारमध्ये घेऊन स्मूथ होईपर्यंत ब्लेंड करून घ्या.
  5. भाजलेल्या रव्यात थोडे गगनगिरी तूप घालून मिक्स करा. त्यानंतर गरम केलेले दूध घालून व्यवस्थित एकत्र करा.
  6. त्यामध्ये इलायची पावडर आणि आवडीनुसार साखर घालून मिक्स करा.
  7. मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात ब्लेंड केलेला आंब्याचा रस घालून पुन्हा व्यवस्थित मिक्स करा.
  8. शेवटी भाजलेले काजू-बदाम घालून हलक्या हाताने मिक्स करा.
  9. तयार आंब्याचा शिरा प्लेटमध्ये सर्व्ह करून वरून काजू, बदाम आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी गार्निश करा.
Search