नवरात्रीच्या उपवासात रोज खिचडी आणि भगर खाऊन कंटाळा आला आहे का❓
तर आज आपण बनवणार आहोत नवरात्री स्पेशल चमचमीत उपवास थाळी – जी स्वादिष्ट, पौष्टिक आणि उपवासासाठी अगदी परफेक्ट आहे!

साहित्य:
वरई भातासाठी:
१ वाटी वरई (भगर)
१ चमचा गगनगिरी घी
२–३ हिरव्या मिरच्या (बारीक वाटलेल्या)
२ मध्यम आकाराचे बटाटे (कापलेले)
२ चमचे भिजवलेले शेंगदाणे
मीठ चवीनुसार
पाणी आवश्यकतेनुसार
१ चमचा साखर
१ वाटी शेंगदाण्याचा कूट
कोथिंबीर गार्निशसाठी
लाल भोपळ्याची भाजीसाठी:
१ वाटी लाल भोपळा (कापलेला)
१ चमचा गगनगिरी घी
२–३ हिरव्या मिरच्या (कापलेल्या)
मीठ चवीनुसार
२ चमचे शेंगदाण्याचा कूट
कोथिंबीर गार्निशसाठी
थाळीसोबत:
आलू शेंगदाणा भाजी
गगनगिरी दही
उपवास भाजीनीची भाकरी
वरई, बटाटा आणि साबुदाण्याच्या पापड्या

कृती:
वरई भाताची कृती:
सर्वप्रथम एका कढईत वरई भाजून घ्या.
त्याच कढईत गगनगिरी घी टाकून हिरवी मिरची, बटाट्याचे काप आणि भिजवलेले शेंगदाणे परता.
त्यात मीठ टाका आणि झाकण ठेवून एक वाफ काढा.
नंतर पाणी आणि थोडी साखर घालून उकळी आणा.
त्यात भाजून ठेवलेली वरई टाका आणि छान मिक्स करा.
शेंगदाण्याचा कूट टाकून एकजीव करा व पुन्हा एक वाफ काढा.
consistency झाल्यावर कोथिंबीर टाकून गार्निश करा.
लाल भोपळ्याची भाजी:
एका पॅनमध्ये गगनगिरी घी गरम करा.
त्यात कापलेली हिरवी मिरची टाकून परता.
आता त्यात लाल भोपळ्याचे तुकडे घालून मिक्स करा.
मीठ टाकून झाकण ठेवून एक वाफ काढा.
भाजी शिजल्यावर शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर घालून गार्निश करा.
थाळी सजावट:
आलू शेंगदाणा भाजी, लाल भोपळ्याची भाजी, गगनगिरी दही, वरई भात, भाजीनीची भाकरी आणि पापड्या एकत्र करून थाळी सजवा

Search