आज आपण बनवणार आहोत नवरात्री स्पेशल क्रिस्पी पनीर साबुदाणा पकोडे
उपासासाठी स्वादिष्ट, कुरकुरीत आणि हेल्दी स्नॅक जो नवरात्रीसाठी अगदी परफेक्ट आहे.
साहित्य:
गगनगिरी मलाई पनीर (क्यूब्स)
उकडलेले व स्मॅश केलेले बटाटे
भिजवलेला साबुदाणा
हिरवी चटणी
मीठ (चवीनुसार)
लाल तिखट
बारीक चिरलेली कोथिंबीर
लिंबाचा रस
तळण्यासाठी तेल
गगनगिरी दही (सर्व्ह करण्यासाठी)
कृती:
पनीरचे छोटे-छोटे क्यूब्स कट करून घ्या.
एका बाऊलमध्ये उकडलेले बटाटे, भिजवलेला साबुदाणा, हिरवी चटणी, मीठ, लाल तिखट, कोथिंबीर आणि लिंबाचा रस टाकून मिक्स करा.
या मिश्रणाने पनीरचे क्यूब्स छान कोट करून घ्या.
पकोडे गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्या.
गगनगिरी दही आणि हिरवी चटणीसोबत सर्व्ह करा आणि आनंद घ्या!