दिवाळीच्या गोड फराळासोबत खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत चकली बनवायला तयार आहात का?
या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत पारंपरिक पद्धतीने चकली कशी बनवायची — घरच्या घरी सोपी आणि स्वादिष्ट!

साहित्य :
तांदूळ – १ वाटी
चणाडाळ – ½ वाटी
तूरडाळ – ½ वाटी
मूगडाळ – ½ वाटी
उडीदडाळ – ½ वाटी
धने – २ चमचे
जिरे – १ चमचा
ओवा – ½ चमचा
तीळ – १ चमचा
हिंग – ¼ चमचा
हळद पावडर – ½ चमचा
लाल तिखट – १ चमचा
मीठ – चवीनुसार
भाजणीचं पीठ – २ वाट्या
पाणी – आवश्यकतेनुसार
गगनगिरी तूप – चकल्या तळण्यासाठी

कृती :
एका कढईत तांदूळ भाजून घ्या.
त्यानंतर चणाडाळ, तूरडाळ, मूगडाळ आणि उडीदडाळ प्रत्येकी भाजून घ्या.
नंतर धने आणि जिरे सुद्धा भाजून घ्या.
एका भांड्यात पाणी उकळा आणि त्यात हिंग, हळद पावडर आणि लाल तिखट टाकून मिक्स करा.
त्यात ओवा, तीळ आणि भाजणीचं पीठ टाकून मिक्स करा.
चवीनुसार मीठ टाकून हे मिश्रण झाकण ठेऊन एक वाफ काढा.
पीठ बाहेर काढून चांगलं मळून घ्या.
चकली मेकरमध्ये घालून गोल गोल चकल्या बनवा.
गरम तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.

Search