दिवाळीचा फराळ म्हटलं की चिवडा हा आवर्जून बनवला जातो! आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत, स्वादिष्ट आणि घरगुती भडंग चिवडा.
या रेसिपीत आपण वापरणार आहोत मुरमुरे, मक्याचे पोहे, कढीपत्ता, मिरच्या, शेंगदाणे, खोबरे आणि बरेच काही.
ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि घरच्या घरी बनवता येते.
साहित्य :
मुरमुरे – २ वाट्या
मक्याचे पोहे – १ वाटी
कढीपत्ता – १०-१२ पाने
बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या – २
मनुके – १ चमचा
काजू – १ चमचा (अर्धे कापलेले)
शेंगदाणे – २ चमचे
खोबऱ्याचे काप – १ चमचा
मीठ – चवीनुसार
हळद – ½ चमचा
लाल तिखट – १ चमचा
चिवडा मसाला – १ चमचा
पिठी साखर – १ चमचा
फरसण – आवडीनुसार
तेल – तळण्यासाठी
कृती :
कढईत तेल गरम करून त्यात चाळणीच्या साहाय्याने प्रथम मिरच्या तळून घ्या.
नंतर कढीपत्ता, मग पोहे, त्यानंतर मक्याचे पोहे तळून घ्या.
त्याच तेलात काजू, शेंगदाणे आणि खोबऱ्याचे काप सोनेरी होईपर्यंत तळा.
सर्व तळलेले घटक एका मोठ्या ताटात एकत्र करा.
त्यावर चवीनुसार मीठ, चिवडा मसाला आणि पिठी साखर टाका.
वेगळ्या छोट्या कढईत तेल गरम करून त्यात हळद व लाल तिखट टाका आणि ते मिश्रण चिवड्यावर घाला.
सर्व घटक छानपणे मिक्स करा.
शेवटी फरसण टाकून सर्व्ह करा.