तवा पुलाव

साहित्य:

  • बासमती तांदूळ – आवश्यकतेनुसार
  • S.R. Thorat Gagangiri Malai Paneer – आवश्यकतेनुसार
  • गाजर – कापलेले
  • कांदा – कापलेला
  • टोमॅटो – कापलेले
  • लाल, हिरवी आणि पिवळी शिमला मिरची – कापलेली
  • मटर – आवश्यकतेनुसार
  • हिरवी मिरची – १–२
  • लसूण – क्रश केलेला
  • जिरे – आवश्यकतेनुसार
  • Gagangiri Butter – आवश्यकतेनुसार
  • हळद – १ टेबलस्पून
  • पावभाजी मसाला – आवश्यकतेनुसार
  • लाल तिखट – आवश्यकतेनुसार
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – थोडे
  • कोथिंबीर – गार्निशिंगसाठी
  • Gagangiri Dahi – सर्व्ह करण्यासाठी
  • पाणी – आवश्यकतेनुसार

कृती:

  1. कढईमध्ये पाणी घेऊन त्यात चवीनुसार मीठ आणि थोडे तेल घाला. पाणी उकळल्यानंतर स्वच्छ केलेला बासमती तांदूळ घाला.
  2. तांदूळ शिजल्यानंतर तो पाण्यातून वेगळा काढून बाजूला ठेवा.
  3. Gagangiri Malai Paneerचे तुकडे करून घ्या.
  4. पॅनमध्ये Gagangiri Butter घालून वितळवा. त्यात पनीरचे तुकडे घालून हलका गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करा आणि पनीर बाहेर काढून ठेवा.
  5. त्याच पॅनमध्ये जिरे, कांदा, क्रश केलेला लसूण आणि हिरवी मिरची घालून परता.
  6. त्यात गाजर आणि टोमॅटो घालून मिक्स करा आणि झाकण ठेवून एक वाफ येऊ द्या.
  7. आता मटर, हळद, पावभाजी मसाला आणि लाल तिखट घालून व्यवस्थित परतून घ्या.
  8. चवीनुसार मीठ घालून लाल, हिरवी आणि पिवळी शिमला मिरची तसेच फ्राय केलेले पनीर घाला आणि मिक्स करा.
  9. त्यात शिजवलेला बासमती राइस घालून सर्व साहित्य हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करा.
  10. झाकण ठेवून एक वाफ येऊ द्या.
  11. तयार तवा पुलाव प्लेटमध्ये काढून कोथिंबिरीने गार्निश करा आणि Gagangiri Dahi सोबत सर्व्ह करा.
Search