साहित्य
- मखाना – आवश्यकतेनुसार
- ॲक्टिव्ह काऊ मिल्क – आवश्यकतेनुसार
- गगनगिरी तूप – आवश्यकतेनुसार
- काजू – आवश्यकतेनुसार
- बदाम – आवश्यकतेनुसार
- साखर – चवीनुसार
- वेलची पावडर – थोडीशी
- किसलेले खोबरे – आवश्यकतेनुसार
- पिस्ते – सजावटीसाठी
कृती
- एका पॅनमध्ये गगनगिरी तूप घेऊन त्यात मखाने घाला आणि ते कुरकुरीत होईपर्यंत कोरडे भाजून घ्या.
- त्याचप्रमाणे एका पॅनमध्ये गगनगिरी तूप गरम करून त्यात काजू आणि बदाम घाला. ते सोनेरी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्या.
- एका भांड्यात ॲक्टिव्ह काऊ मिल्क घेऊन ते चांगले उकळून घ्या.
- भाजलेले काही काजू आणि मखाने मिक्सरमध्ये घेऊन त्याची बारीक पावडर करून घ्या.
- आता उरलेले भाजलेले मखाने गगनगिरी तुपात घालून चांगले मिक्स करा.
- त्यामध्ये वेलची पावडर, चवीनुसार साखर, मखाना-बदामाची तयार केलेली पावडर आणि किसलेले खोबरे घाला.
- त्यात भाजलेले ड्रायफ्रूट्स आणि थोडे गगनगिरी तूप घालून सर्व साहित्य चांगले मिक्स करा.
- तयार झालेल्या मखाना खिरीवर पिस्त्याने सजावट करा.
- पौष्टिक आणि स्वादिष्ट नवरात्री स्पेशल मखाना खीर गरम किंवा थंड सर्व्ह करा.