साहित्य
- ॲक्टिव्ह काऊ मिल्क – आवश्यकतेनुसार
- सीताफळाचा गर – आवश्यकतेनुसार
- बदाम – बारीक चिरलेले
- काजू – बारीक चिरलेले
- पिस्ते – सजावटीसाठी
- साखर – १ कप
- केशर – थोडेसे
- वेलची पावडर – थोडीशी
कृती
- एका भांड्यात ॲक्टिव्ह काऊ मिल्क घेऊन चांगले उकळून घ्या.
- उकळलेल्या दुधात केशर आणि वेलची पावडर घालून चांगले मिक्स करा.
- त्यामध्ये १ कप साखर घालून साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत मिक्स करा.
- आता त्यात बारीक चिरलेले बदाम आणि काजू घालून पुन्हा चांगले मिक्स करा.
- त्यानंतर सीताफळाचा गर घालून सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करा.
- तयार झालेल्या रबडीवर बारीक चिरलेल्या पिस्त्याने सजावट करा.
- स्वादिष्ट आणि पौष्टिक कस्टर्ड ॲपल रबडी थंड किंवा आवडीनुसार सर्व्ह करा.